संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय मारकवार यांचे अपघाती निधन
मूल पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मूल तालुका अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, माँ दुर्गा मंदीर विश्वस्थ मंडळाचे उपाध्यक्ष, मूल तालुका ओबीसी समन्वय समितीचे सल्लागार, मे लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक, सुपरिचीत कंञाटदार याशिवाय विविध सामाजिक, धार्मिक, सहकार, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी आणि हितचितंक, तालुक्यातील काँग्रेसची शान, धडाडीचा, उत्साही आणि लढवय्या नेता, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा भाऊ आदरणिय संजयभाऊ मारकवार हे झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान स्वर्गवासी झाले. मृत्यु समयी ते ५३ वर्षाचे होते, त्यांचे पश्चात ज्येष्ठ बंधु राजुभाऊ, पत्नी लक्ष्मीवहीणी, मुलगा अनिकेत, मुलगी अपुर्वा यांचेसह वहीणी, बहीणी, पुतणे असा मोठा परीवार आहे. उद्या दुपारी १२.३० वा. नंतर स्व. संजुभाऊ मारकवार यांचेवर त्यांचे मुळ गांवी राजगड येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
संजुभाऊ मारकवार यांचा मृत्यु अनेकांना चटका देवुन जाणारा असुन त्यांच्या अचानक निघुन जाण्याने एकट्या काँग्रेसचेच नव्हे तर अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थाचे कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, त्यांच्या निघुन जाण्याने तालुक्यातील काँग्रेस मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लढवय्या तेवढाच समजदार, मार्गदर्शक, अभ्यासु कर्तबगार नेता आणि वक्ता तालुक्याने हरविला अश्या प्रतिक्रिया सामान्य नागरीकांशिवाय अनेक उच्च पदस्थ आधिका-यांनी व्यक्त केल्या आहेत. अश्या बहुआयामी पण आपल्याला सोडुन कायमचे दुर निघुन गेलेल्या स्व. संजयभाऊ मारकवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली….



