Vidarbh24News

Latest Online Breaking News

सतत सहा तास अभ्यास करुन छत्रपती शिवाजी क्लब ने डाँ.आँबेडकरांना वाहिली आदरांजली

सकाळी ११:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत डाँ.बाबासाहेब आँबेडकर व अन्य महापुरुषांच्या जीवन चरीत्राचे केले वाचन

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
देसाईगंजः- दिनांक ०६डिसेंबर रोजी वैविध्यपूर्ण समाजोपयोगी कार्यासाठी देसाईगंज शहरात प्रसिद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी क्लब ने विद्यार्थ्याँकरीता सतत सहा तास पुस्तक वाचन असा अभिनव कार्यक्रम आयोजित केला.यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यात एकुण पन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर उपक्रम डाँ.बाबासाहेब आँबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला हे विशेष.सकाळीच सदर क्लबचे सर्व सदस्यांनी दिक्षाभुमी परिसर स्वच्छ केला व डाँ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पन करुन अभिवादन केले व आदरांजली अर्पण केली. शहरातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी गत सहा महिन्यापासून सुरू असणाऱ्या कोचींग वर्गातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत डाँ.बाबासाहेब आँबेडकर व अन्य महापुरुषांच्या जीवन चरीत्राचे व प्रबोधानात्मक पुस्तकांचे योग्य सामाजिक अंतर राखून वाचन केले.हा उपक्रम देसाईगंज येथील राजेँद्र वार्ड येथील समाज मंदिर व आँबेडकर वार्ड येथील विहारात घेण्यात आला. या उपक्रमाची नगरपरीषद कार्यालय नोँद घेणार आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी सर्व धर्म समभाव व ज्या ज्या महापुरुषांनी लोकसमाज व देशनिर्माणीच्या चळवळीत स्वतःला झोकून देवून हा देश उभा केला,त्यांच्या कार्याचा गौरव होईल असे कार्य आम्ही सातत्याने करीत राहणार असल्याची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी क्लब च्या कार्यकर्त्यांनी दिली.सतत सहा तास पुस्तक वाचनाकरीता महात्मा ज्योतीबा फुले सार्व.वाचणालय विहीरगाव ने पुस्तकांचा पुरवठा केला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!