मांगुर्डा (नेताजी पोड )येथे क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांची जयंती साजरी
पांढरकवडा ( डॉ .गणेश नैताम / तालुका प्रतिनिधि ) :- दि.28 रोजी येथे नेताजी पोड मांगुर्डा येथे क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लेतुजी जूनघरे माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्घाटक म्हणून रामदास जी टेकाम,
प्रमुख अतिथी वामन ठोबळे , गणेश आत्राम ,गजानन आत्राम, गजानन मेश्राम, चडकू वडदे, तुकाराम टेकाम, चंडकु, नानाजी आत्राम, कैलास ( ग्राम साथी झरी ) प्रामुख्याने उपस्थित होते.
नाईक,महाजन, घट्टया, कारभारी, व समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा, शामा दादा कोलाम यांच्या प्रतिमेला पूजन करून व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सर्व मान्यवरांचे हार देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन संपल्यानंतर, एका दानशूर व्यक्तीने १० सोलापुरी चादर उपलब्ध करून दिली व गावातील अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या १०विधवा महिलांना या चादरीचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आत्राम व आभार प्रदर्शन सुरेश मुंडाले यांनी केले. यानंतर गावातून रॅली काढण्यात आली व अध्यक्षाचे परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



