2014 पासून प्रलंबित असलेले RSI – RPI – R- DYSP यांचे प्रमोशन लवकरच होणार पोलीस बॉईज असोसिएशनच्या मागणीला लवकरच येणार यश
-उपमुख्यमंत्री अजित ( दादा ) पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे साहेब यांना पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी दिले निवेदन.
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद:-आज दिनांक १९नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे साहेब हे त्यांच्या वयक्तिक कामानिमित्त उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी मुसळे साहेब यांच्यासोबत उस्मानाबाद ते सोलापूर प्रवास करत त्यांच्यासोबत पोलीसांच्या व त्यांच्या पाल्यांच्या विविध मागण्यांवर सुमारे एक तास चर्चा केली तसेच या चर्चे दरम्यान मुसळे साहेब यांना तीन मागण्यांचे निवेदन देण्यात आले*
१-DG लोन लवकरात लवकर मंजूर करावे.
२- संपूर्ण गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला दीडपट वेतन देण्यात यावे
३-२०१४ पासून प्रलंबित असलेले RSI – RPI व R – DYSP यांचे प्रमोशन लवकरात लवकर करण्यात यावे.
या अत्यंत महत्त्वाच्या तीन मागण्यांचे निवेदन देण्यात आले असता मुसळे साहेब यांनी पोलीस बॉईज असोसिएशनचे हे निवेदन अजित ( दादा ) पवार साहेब यांच्या हातात देऊन लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांना सांगितले.
पोलीस बॉईज असोसिएशन सदैव महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.



