Vidarbh24News

Latest Online Breaking News

कवठी परिसरात विजेचा लपंडाव…

  कवठी परिसरात विजेचा लपंडाव…

  महावितरण कंपनीचे व अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष….

कवठी प्रतिनिधी :-  चंद्रपूर जिल्हा हा ऊर्जा निर्मिती करणारा जिल्हा आहे. खाजगी व शासकीय वीजनिर्मित केंद्राच्या माध्यमातून 4420 M. V. वीजनिर्मित होते परंतु, चंद्रपूर जिल्हात सावली तालुक्यातील कवठी परिसरात मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव नियमित चालू आहे.                                                                    या वर्षी संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोविड -19 मुळे ग्रामीण भागातील लोकांना करोना काळात कोणत्याही प्रकारचे रोजगार मिळत नसल्याने जनता आधीच चिंताग्रस्त झाली आहे. राज्य शासनाकडे वीज बिल माफी साठी अनेक निवेदन आणि आंदोलने करण्यात आली. परंतु त्याच काहीच फायदा झालेला नाही. एक तर वीज वितरण कंपनीकडून वीज दर वाढविण्यात आल्याने आता भरमसाठ वीज बिल येऊ लागले आहेत. याचा चांगलाच फटका ग्रामीण जनतेला बसत आहे.                                                     यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद असल्याने यावर्षीचे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणाची प्रणाली राबून ऑनलाईन शिक्षण चालू केले. त्यासाठी ग्रामीण भागातील पालक वर्ग आपल्या मुला- मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये मनून आपल्या परिस्थितीचा विचार न करता त्यांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले. परंतु आता कवठी परिसरातील कवठी, पारडी, रुद्रापूर, हरणघाट, सिंगापूर येथील लाईट कधीही जाणे- येणे असा विजेचा लपंडाव नियमितच चालू झालेला असल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण वेळापत्रकच पूर्णपणे बिघडत चाललेले आहे. त्यामुळे विध्यार्थी व पालक वर्ग पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहेत.                                                     यामुळे महावितरण कंपनीने व सावली तालुका वीज वितरण अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन नियमित वीज वितरित करावी अशी मागणी या परिसरातील विद्यार्थी, पालक वर्ग व सर्व नागरिक करीत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास या परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!