Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर आठवडी बाजारची नियोजीत जागा गेली कुठ ? मग जागा असेल तर राजुर येथील प्रशासनच अपघात होण्याची वाट बघत आहे का ?

राजूर कॉलरी : राजूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे राजूर आठवडी बाजार हळूहळू आपले अस्तित्व गमावत असून कालांतराने राजूरला आठवडी बाजार भरणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. आठवडी बाजराची नियोजित जागा असतानाही येथील भगतसिंग चौकातील वेकोलि चे जड वाहन चालणाऱ्या चक्क रहदारीच्या रस्त्यावर दाटीदाटीने रविवारच्या आठवडी बाजार भरायला लागला आहे, प्रसंगी मोठ्या अपघाताची व सोशल डिस्टनसिंग चे पालन होत नसल्याने आरोग्याची समस्या सुदधा निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून राजूर येथे दर रविवारला आठवडी बाजार भरतो आहे. येथे दगडी कोळशाच्या खाणी, चुना दगडाच्या खाणी व मोठा चुना उत्पादन करणाऱ्या चुना कारखाने असल्याने येथील आठवडी बाजाराला मोठे महत्त्व आहे. ह्या राजूर गावाला १० ते १५ गावे जोडून असल्याने तसेच इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या असल्याने येथील बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

एके काळी राजूरच्या बाजार गावातील बुद्धीविहारासमोरील मोठ्या मोकळ्या जागेवर भरायचा, परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे हळूहळू त्या ठिकाणी भरपूर दुकानदारांनी अतिक्रमण करून पक्की दुकाने थाटल्यामुळे बाजारासाठी जागाच उरली नसल्याने आठवडी बाजाराचे अस्तित्वच धोक्यात आले होते, परिणामी ह्या आठवडी बाजाराला तेथून प्रथिमिक आरोग्य केंद्र शेजारी मोठी मोकळी जागा असलेल्या सरकारी जागेवर हलविण्यात आले. परंतु त्या ठिकाणी प्रशासनाने बाजाराला आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी जसे ओटे, रस्ते,विजेची व्यवस्था व पाणी ह्या मूलभूत गरजांची पूर्तता न केल्याने बाजारात दुकाने लावण्यासाठी आलेले व्यावसायिक मोठ्या कष्टात त्याठिकाणी आपला व्यवसाय करतात.

पावसाळ्यात तर दुकानदारांना व गावातील जनतेला चिखल तुडवीत बाजार करावा लागतो. ह्याचा दुष्परिणाम असा होत आहे की राजूरच्या आठवडी बाजारात दुकाने लावण्यासाठी येणारे दुकान हळूहळू कमी व्हायला लागले आहेत आणि ह्यामुळे ह्या बाजाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ह्याच मुळे आठवडी बाजारात दुकाने लावणार्यांनी नियोजित जागेवर मूलभूत सुविधा नसल्याने येथील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौकातील मुख्य जड वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर दुकाने लावायला सुरुवात केली आहे. ह्याकडे राजूर ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष असून राजूर गावाची मुख्य शान असलेले आठवडी बाजार मात्र अस्तित्वाची लढाई लढत आहे. आता या कडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते काय करतील याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. या रस्त्यावरील रहदारीमुळे अपघात या घातपात झाल्यास यासाठी जीमेदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!