Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी नगर परिषद व गौरक्षणच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ‘एक रोटी गाय की,

वणी : नगर परिषद व गौरक्षणच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ‘एक रोटी गाय की, राबविल्या जात आहे त्या साठी रोटी फेकून देण्यापेक्षा गाईला अन्नदान करण्यासाठी हात समोर करण्याचे आव्हान नगरअध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी योजनेच्या शुभारंभप्रसंगी केले आहे.

वणी नगर परिषदेने शहरातील स्वच्छते सोबत मुक्या जानवरा साठी एक अभिनव योजना तयार केली असून या कल्पने मुळे शहरातील जनता त्याच्या कामाचे कौतुक करीत आहे. शहरातील घन कचरा ऊचलन्यासाठी स्वंच्छ भारत मिशन अंतर्गत घंटा गाडीची योजना अनेक वर्षा पासुन साकार होत आहे त्या मुळे शहरातील स्वच्छेतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटला आहे या योजनेला आता नविन स्वरूप देण्यात आले असुन आता १० घंटा गाड्यांच्या मागे एक पाञ बसविले असुन त्या मध्ये गाई साठी आपल्या अन्नातील ऊरलेली पोळी टाकण्यासाठी जागा निश्चित केली असून तेथे ती टाकल्यास दुपारी शहरातील घंटागाडीतील पोळी एकञ करून उंज्वल गौरक्ष येथील गाईना पुरवठा करण्यात येणार आह,हा कार्यक्रम दि 17ऑक्टोबर शनिवारी दुपारी ११ वा.वणी नगर परिषद मध्ये या योजनेचे उदघाटन प्रमुख म्हणून मा आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार याच्या हस्ते करण्यात आले या वेळी नगराध्यक्ष तारेन्द्रं बोर्डे, मुख्याधिकारी महेश रामगुंडे प्रशांत मांधमशेट्टीवार, सुनिल झाबक,मंगेश झाडे, निखिल झाडे, अनिल चिडांलीया, संभाजी वाघमारे व नगर पालिकाचे कर्मचारी याची उपस्थित होती.
या कार्यक्रमच्या वेळी ‘बोलतो त्याला अन्न मिळतो ‘, अन्न शिजवल्या नंतर कुटूंबातील सदस्याचे जेवण संपल्यानंतर ते अन्न उकिरड्या वर फेकून वराहांना आमंत्रित करण्यापेक्षा ते रोटी गाईला देऊन अन्न दान करुन योजनेला पुर्ण सफल करन्याची विनंती नगराध्यक्ष तारेन्द्रं बोर्डे यांनी केली तर आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यानी या योजनेची प्रशंसा करून हा चांगल्या उपक्रमा बदल समाधान व्यक्त केले. अन्न साठी कष्टकरणाऱ्या शेतकऱ्याचा मेहनतीचे खरी कदर ही अन्न वाया नघालने हेच कष्ठाची ओळख असल्याच्या प्रतिक्रिया मुख्यकार्यकारी अधिकारी महेश रामगुंडे यांनी व्यक्त केल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!