प्रहार संघटना शाखा गडचिरोली च्या वतीने रक्तदान शिबीरचे आयोजन
-जिल्ह्यातील तरुणांनी रक्तदान शिबिरास दिला चांगला प्रतिसाद
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- कोरोना महामारीच्या काळात जिल्यात दररोज साधारण २०ते २५ रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. जिल्हा रुग्णालयात विविध शाश्त्रक्रिया आणि आजारी रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. कोरोना मुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला असून, शिवाय अनेक मोठे रक्तदान शिबीर कोरोना मुळे आयोजित होऊ शकले नाही, त्यामुळे जिल्ह्यात खूपच कमी रक्तसाठा असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय गडचिरोली यांचे कडून प्रहार तालुका अध्यक्ष संकेत गड्डमवार यांना मिडाली,
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदानाचे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे गडचिरोली तालुका अध्यक्ष संकेत गड्डमवार आणि पक्षाचे शहर अध्यक्ष स्वप्नील गौतम यांनी केला. त्याला प्रतिसाद देत कोरोनाचा संकटाचा पार्श्यभूमीवर गर्दी टाळत दिनांक ११आक्टोबर रोजी ला सकाळी ०१ वा. रक्तदान शिबिराची सुरुवात केल्याने. जिल्ह्यातील तरुणांनी रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला या रक्तदान शिबिराला गडचिरोली सामान्य रुग्णालय रक्त पेढीचे डॉ. कुंभारे, सतीश तडकलावार, नानाजी देशमुख, सुरज चांदेकर, उपस्थित होते रक्तदाता शिबिराला यशश्वी करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष शाखा तालुका गडचिरोलीचे विनोद जांभूळकर, अक्षय मेश्राम,गोलू भाऊ मेश्राम, पवन देशपांडे,पंकज देवतळे,निखिल वाकडे,मयूर उके,वैभव मेश्राम
उपस्थित होते, शिबिराला आलेल्या सगड्या रक्तदात्यांचे प्रहार जनशक्ती पक्ष शाखा गडचिरोली वतीने अभिनंदन केले आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



