Vidarbh24News

Latest Online Breaking News

उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे

-रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून रस्ता सुरळीत करण्याची उलगुलान संघटनेची मागणी

विदर्भ 24न्यूज/
जिल्हा प्रतिनिधी/ मूल:-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर मूल येथे रेल्वे गेट जवळ मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच या खड्ड्यामुळे बरेच किरकोळ अपघात झाले होते. बऱ्याच दिवसापासून हे खड्डे वाहतुकीस अडचण निर्माण करत होते.

प्रशासनानेही सदर खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ही बाब उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई व त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्षात आली. कार्यकर्त्यांनी तात्काळ लक्ष देऊन सदर रस्त्यावरील खड्ड्यावर मुरूम व गिट्टी आणून टाकली व खड्डे व्यवस्थित केले. तसेच सदर रस्त्यावरील खड्डे प्रशासनाने तात्काळ बुजवून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी सुद्धा केली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, अक्षय दुमावार तथा उलगुलान संघटनेच्या अन्य कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!