वणी येथे उमेदच्या असंख्य महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार …..मूक मोर्चातुन सरकारचा निषेध करणार
वणी येथील उमेदच्या सर्व महिला कोणत्याही राजकीय पाठिंबा न घेता रस्त्यावर उतरणार……….
वणी – वणी येथील उमेदच्या सर्व महिला सोमवारी बाह्य संस्थेकड़े वर्ग करण्याचा हालचाली विरोधात रस्त्यावर उतरणार आहे व तसेच सरकारच्या मूक मोर्चातुन तीव्र निषेध सुद्धा करणार आहे.त्याकरिता सर्व महिला वणी येथील पाण्याचा टाकी जवळ जमणार आहे . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली विरोधात वणी येथे असंख्य महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत.या अभियानाला जोडलेल्या 50,00000 महिलांचा जीवनोन्नती मार्ग आणखी खडतर होत चाललेला आहे .शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला ,असून संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे .महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी राज्यातील दहा लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे .दि. 12 ऑक्टोबरला वणी येथील विधानसभा क्षेत्रातील असंख्य महिला मूकमोर्चा काढून शासनात विचारणार आहे
वणी विधानसभा क्षेत्रात उमेद अभियानाचे जवळपास 5000 बचत गट ,200 ग्रामसंघ व 8 प्रभाग संघ कार्यरत आहे यामध्ये 50 हजारपेक्षा जास्त कुटुंब जोडल्या गेलेल्या आहेत. उमेदचा अभियानात बँक सखी ,आर्थिक साक्षरतासखी,कृषिसखी ,पशुसखी ,ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी यासारखे अनेक कॅडर ग्रामीण कुटुंबाचे शाश्वत उपजीविकेसाठी विविध उपक्रमाचे माध्यमातून कार्यरत आहे. याशिवाय कर्मचारी या महिलांसाठी अहोरात्र झटत आहेत . विविध संस्थांना माहिती मार्गदर्शन, निधी देऊन राज्य व केंद्र शासनाने महिलांचा उन्नतिसाठी प्रयत्न केलेले आहेत.
आता अनेक महिला स्वतःची उत्पादने निर्माण करून व्यवसायाची कास धरून आत्मनिर्भर होता .हे मात्र त्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्याऐवजी आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने या अभियानाच्या मुळावर घाव घालण्याचा मार्ग अवलंबिला आहे.ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक नूतनीकरण कराल संपलेत .अशा 450 कर्मचारी यांना गेल्या महिन्याभरात ताटकळत ठेवले .करार नूतनीकरण होईल, तुम्ही काम करत राहा ! असे सांगितले . नुकतेच एक परिपत्रक काढून कार्यमुक्त करण्याचा सूचना देऊन सर्वांचे काम थांबवले.केंद्र शासनाच्या एका पत्राचा आधार घेऊन बाहय संस्थेमार्फत नोकर भरती करण्याचे षड्यंत्र राबविले जात आहे. मात्र हे करताना अनेक वर्षापासून या अभियानात कार्यरत कर्मचारी व कॅडर यांच्या भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही.बाह्य संस्थेकडे देण्यापूर्वी कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे समायोजन करणे आवश्यक होते 
मात्र तसे न करता सरसकट सर्वांना बेरोजगार करण्यात आली आहे.या अभियानामुळे जीवनमान उंचावलेल्या महिलांचे खच्चीकरण करणे हा प्रकार सुरू झाला आहे .यामुळे सरकार बद्दल तीव्र आक्षेप घेतला असून महिला रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. या मूकमोर्चात covid-19 च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वणीतील सर्व महिला रस्त्यावर उतरणार आहेत.
या मूकमोर्चा तून काही मागण्या केल्या आहेत.1) गट ग्रामसंघ व प्रभात संघाना दिला जाणारा निधी वितरित करावा. 2)बाह्य संस्थेचा हस्तक्षेप थांबवावा. 3) कॅडर चे थकीत मानधन त्वरित वितरित करावे. 4) ज्या समूहाना खेळते भांडवल मिळाले नाही त्यांना निधी द्यावा.5)अभियानातील कर्मचारी यांची सेवा अविरत सुरू ठेवावी ,जेणेकरून महिलांच्या संस्था आणखी बळकट होतील. या मागण्या केल्या जाणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनाला कोणतेही राजकीय पाठबळ न घेता स्वतः महिला रस्त्यावर उतरत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्यांना पूर्ववत कामावर घेऊन महिलांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे .अन्यथा राज्य सरकारला यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा महिलांनी दिला आहे.




