Vidarbh24News

Latest Online Breaking News

MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकित निर्णय…

MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकित निर्णय…. 

मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारचा निर्णय….. 

मुंबई :-             मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर राज्य सरकारने अखेर आज मोठा निर्णय घेत MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) ची (राज्यसेवा ) ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. २लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्या नंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची आज बैठक झाली . या बैठकीत MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. या संबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या  दृष्टीने हा निर्णय झाला. “११ ऑक्टोम्बर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होणार होती. मात्र करोना आणि लॉकडाऊनचं संकट होत. आणि काही प्रमाणात अजूनही आहेच. करोणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्रास होवू नये याचा सारासार विचार करता विध्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजेत. हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही MPSC ची परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल ‘असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल.                                                               आजच खासदार उदयन राजे यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होत. मराठा समाज संयमी आणि शांत आहे. पण प्रसंगी आक्रमकही होवू शकतो. असंही त्यांनी म्हटलं होत. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केल होत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने “११ ऑक्टोम्बरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!