Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी शहरातील विठ्ठल वाडी मध्ये कोंबड बाजारावर धाड. कोंबड बाजारावर डिबी पथकाची धाड ९ आरोपिंसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

 

वणी – कोंबड्यांची भांडण लावून त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्यांना सापळा रचून रंगेहात पकडले, वणी पोलिसांची दमदार कार्यवाही करण्यात आली.
वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरात भर वस्तीत आज सकाळी१०:३० वाजता कायद्याला शेंडीवर बसवून कोंबड बाजार भरवून कोंबड्यांचे भांडण लावायची आणि त्यावरून पैस्यांचा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली,लगेच संजय पूजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात डिबी पथकाने धाड टाकून ९ आरोपिंना अटक करुन सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र जुगार कायदा १२(ब)(क)अंतर्गत भांदवी कलम,१८८,२६९ अंतर्गत आरोपी १ )अतुल पुरुषोत्तम बोबडे,२)खुशाल शरद मोहितकर ३)मंगेश वासुदेव ठेंगणे ४)राहुल रुपेश फुटाणे ५)बंडू जयराम ढेंगले ६)रुपेश सुरेश आंबूरकर ७)सुभाष मोहन मोते ८)प्रवीण भास्कर पराते ९)संकेत भास्कर ठाकरे इत्यादी आरोपींना आज ६ ऑक्टोंबर ला सकाळी १०: ३० वाजताचे दरम्यान विठ्ठलवाडी परिसरात कोंबड्यांची झुंज लावुन पैशाचा जुगार खेळत असताना रंगेहात पकडण्याची कार्यवाही करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सहायक फौजदार प्रभाकर कांबळ.पोहवा,/सुदर्शन वाणोळे,प्रकाश गोरेलवार. पोनी/सुनील कुंटावर, डीबी पथकाचे पोना/सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अनिल पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वानडरसवार,मापोका/जया रोगे या सर्वांनी फार शिताफीने सापळा रचून आरोपींना अटक केली.
१६ नगर कोंबडे,५ दुचाकी व नगदी २२ हजार एकशे तीस असा एकूण ७ लाख ३७ हजार तिस रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!