Vidarbh24News

Latest Online Breaking News

आज जय भवानी कामगार संघटनेची शाखा जी आर एन कंपनी साकरी तालुका राजुरा येथे स्थापन करण्यात आली – श्री.सूरज भाऊ ठाकरे. संघटक.

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर/तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.

आज जय भवानी कामगार संघटनेची शाखा जी आर एन कंपनी साकरी तालुका राजुरा येथे स्थापन करण्यात आली – श्री.सूरज भाऊ ठाकरे. संघटक.

⭕*जय भवानी कामगार संघटनेचे शाखा जी आर एन कंपनी साखरी येथे स्थापन.
⭕ कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता चौदा दिवसांचा दिला कालावधी
⭕ कंपनीने जय भवानी कामगार संघटनेचे सुरज ठाकरे यांच्या भीतीने ते येण्या आधीच पोलिसांना पाचारण करून ठेवले होते.

आज दिनांक ०४/१०/२० रोजी जय भवानी कामगार संघटनेची शाखा जी आर एन कंपनी साकरी तालुका राजुरा येथे स्थापन करण्यात आली.
जय भवानी कामगार संघटनेच्या वतीने स्थापनेच्या दिवशी कंपनी प्रशासनाला विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले व सदर मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक २०/१०/२०२० रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे असेल त्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे,

राजुरा विधानसभा क्षेत्र अंतर्गत असलेले सिमेंट कंपनी व कोळसा खाणी यामध्ये स्थानिक बेरोजगारांना जाणीवपूर्वक रोजगार उपलब्ध होत नसल्या मुळे जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे परंतु लोक डाऊन मुळे याला काही प्रमाणामध्ये शिथिलता आली होती परंतु आता परत पुन्हा जय भवानी कामगार संघटना ही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता कंबर कसून राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व सिमेंट कारखाने कथा कोळसा खाणींमध्ये आपल्या युनियन उभारून त्या ठिकाणी काम करीत असलेल्या स्थानिक बेरोजगारांचे पिळवणूक होऊ नये याकडे कंपनीचे लक्ष वेधत आहे व त्यासाठी लढा देत आहे याशिवाय स्थानिक बेरोजगारांना देखील तात्काळ कामावर सांभाळून घेण्यात यावी व परप्रांतीयांना यांचा भरणा येथून कमी करावा यासाठी देखील खूप जास्त आग्रही आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सिमेंट कारखाने व कोळसा खाणी असून देखील येथील तरुण हा आजही रोजगारापासून कोसोदूर आहे त्यामुळे तरुण पिढी ही गुन्हेगारीकडे वळत आहे परंतु राजकीय उदासीनतेमुळे या सर्व तरुण पिढीला हाताशी काम नाही हे प्रामुख्याने व प्रकर्षाने सर्वत्र बोलल्या जात आहे.
परंतु गेल्या १ वर्षांपासून सुरज ठाकरे हे बेरोजगार व कामगारांचे प्रश्न घेऊन सतत प्रशासनाशी लढा देत असल्याने तरुण बेरोजगारांना त्यांच्या बाबत आकर्षण वाढत आहे व सुरज ठाकरेंचे सामर्थ्य हे या भागामध्ये वाढतच चालले आहे .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!