Vidarbh24News

Latest Online Breaking News

आता LPG गॅस हंडी ( सिलेंडर) घरपोच वितरण करताना शुल्क घेतल्यास होणार कारवाई

आता LPG गॅस हंडी  ( सिलेंडर) घरपोच वितरण करताना शुल्क घेतल्यास कारवाई

वणी – (दि.9 सप्टेंबर):- एलपीजी सिलिंडर वितरण करताना होम डिलिव्हरी चार्ज आकारणी केल्यास या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असा निर्णय गॅस वितरण करणाऱ्या देशातील तीनही कंपन्यांनी घेतला आहे.
नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्यावतीने २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसाठी घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते. मात्र नंतर असे शुल्क आकारू नये असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हटले आहे. मात्र राज्यात अजूनही अनेक भागात अशा प्रकारचे शुल्क आकारणी होत आहे. हि समस्या दूर करण्यासाठी सोमवारी ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल या तीनही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. कंपनीचे सहायक व्यवस्थापक स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या गॅस सिलिंडरचा जो दर आहे -तेवढीच रक्कम घरपोच हंडी देताना घ्यावयाची आहे.
त्या पेक्षा जास्त शुल्क तर घेताच येणार नाहीत तसेच महत्वाचे म्हणजे ही हंडी -जर ग्राहकाने गोदामातून घेतली असेल किंवा वितरण करताना घरपोच न देता चौकात उभे राहून ग्राहकाला हंडी दिल्यास ग्राहकाला २७.५० रुपये हंडीच्या मुल्यातून परत द्यावे लागतील – असेही कंपनीचे सहायक व्यवस्थापक – स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले- सप्टेंबर महिन्यात हंडीचे जे दर आहेत .त्यापेक्षा प वितरकांनी एक रुपयाही जास्त घेऊ नये ,असे सस्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!