Vidarbh24News

Latest Online Breaking News

बेरोजगार युवकांसाठी केंद्र सरकार च्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर

युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर निदर्शने.

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली : युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुनाल राऊत यांच्या नेतृत्वात,
देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रोजगाराची साधने निर्माण करावी या मागणीसाठी गडचिरोली काँग्रेच्या वतीने निदर्शने देऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविन्यात आले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते.
प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली असून.


मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे.
रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही.
डिजीटल इंडिया , कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्या आहेत.
केंद्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये लाखोंच्या संख्येने जागा रिक्त असताना नोकर भरतीवर बंदी घातली असून. रस्ते , मंदिरे व पुतळे बनविण्यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार वाढीसाठी शासनाने प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे, आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजीत सिंह, सचीव आसीफ शेख , गडचिरोली जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ.प्रणित जांभूले, निलेश खोरगडे , पीयुष वाकोडीकर , डॉ.नामदेव किरसान , डॉ. चंदा कोडवते , पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राम्हणवाडे , सतीश विधाते , पांडुरंग घोटेकर , विश्वजीत कोवासे , गौरव अलाम , गौरव येनप्रेड्डीवार , डॉ.मेघा सावसाकडे , रामेश्वर शेंदरे , नरेंद्र गजपुरे , उमाकांत हारगुळे , अभय नाकाडे , रजनिकांत मोटघरे, अमर नवघडे , इरशाद शेख आदी उपस्थित होते . कुणाल राऊत यांचे शहरात आगमन झाल्यानंतर गांधी चौक ते काँग्रेस कार्यालयापर्यंत रॅली काढून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!