आयटीआय ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ
आयटीआय ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ
🖥️ आयटीआय प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरू असणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.
🧐 प्रवेशप्रक्रियेचा तपशील आणि अंतिम तारीख
● ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे – २१ ऑगस्ट
● पहिली फेरी पर्याय भरणे – २१ ऑगस्ट
● कच्ची गुणवत्ता यादी – २५ ऑगस्ट
● गुणवत्ता यादीबाबत हरकती – २६ ऑगस्ट
● तीन गुणवत्ता यादी – २७ ऑगस्ट
● पहिली प्रवेश यादी – ३० ऑगस्ट
● पहिल्या यादीतील प्रवेशासाठी १ ते ४ सप्टेंबर
● दुसरी फेरी पर्याय भरणे १ ते ५ सप्टेंबर
● दुसरी प्रवेश यादी – ९ सप्टेंबर
● दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी १० ते १४ सप्टेंबर
● तिसऱ्या फेरीसाठी पर्याय १० ते १५ सप्टेंबर
● तिसरी यादी – १८ सप्टेंबर
● तिसऱ्या यादीतील प्रवेश १९ ते २३ सप्टेंबर
● चौथ्या फेरीसाठी पर्याय १९ ते २४ सप्टेंबर
● चौथी यादी – २८ सप्टेंबर
🏬 राज्यात ४१७ शासकीय, तर ५६९ खासगी आयटीआय आहेत. यात एक लाख २५ हजार ६३२ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे.
📑 राज्यात आजअखेर एक लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी एक लाख २७ हजार ९८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.



