ऑगस्ट महिन्यात येणारे सर्व सण उत्सव घरीच साजरे करण्याचे आवाहन : डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर
ऑगस्ट महिन्यात येणारे सर्व सण उत्सव घरीच साजरे करण्याचे आवाहन : डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर
चंद्रपूर-कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी/पोळा-तान्हा पोळा/प्रतिबंध/२०-२६३८ दिनांक ०४ ऑगस्ट २०२० च्या संदर्भानुसार दिनांक ११/१२ ऑगस्ट २०२० रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दिनांक १८/१९ ऑगस्ट २०२० रोजी पोळा/तान्हापोळा साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन व गृह विभाग मुंबई यांचे परिपत्रक तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ३४ पोट कलम (ग)(C) व (D) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ४३ अनव्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, सामाजिक/धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उर्स इत्यादींना दिनांक १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत बंदी आहे याला अनुसरून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व पोळा/तान्हापोळा सुध्दा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता नागरिकांनी आप आपल्या घरीच साजरा करावा तसेच याबाबत स्थानिक प्रशासन, शांतता समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठकीत यासंबंधीच्या सूचना देण्यात याव्यात असे निर्देश मा. महेश्वर रेड्डी जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी दिले आहे.



