Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर कॉलरी येथे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

 

प्रशासन जागे व्हा !!!!!!!!!नागरिकांचे आरोग्य धोक्यात………..

वणी – वणी तालुक्यातील राजूर गाव खरंतर मिनी इंडिया म्हणून ओळख आहे. मात्र याच राजुर कॉलरीच्या चेहरा गेल्या काही दिवसांपासून विद्रूप होत चाललेला आहे. मागील दहा दिवसापासून तब्बल एक टन कचरा गावाचा रस्त्यावर साचुन असलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीत गाव म्हणून ओळखला जात आहे .डब्ल्यू .सी .एल .ऑफिस पासुन तर बाजार वाडीपर्यंत फक्त आणि फक्त कचरा दिसून येत आहे .या गावची दयनीय अवस्था पाहुन प्रशासन झोपी गेला की काय? व लोकांच्या आरोग्याची खेळत आहे की काय? असे चित्र या गावात घाणीचा साम्राज्यातून दिसून येत आहे .तसेच बस स्थानकाजवळ ,मोठ्या प्रमाणात घाण होताना दिसत आहे .तिथे मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था सुद्धा नाही, म्हणून नागरिकांची दुर्दैवी अवस्था झाली आहे. नेमका कचरा कुठे टाकायचा ? हा सुद्धा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला आहे .येथील सुस्त प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहेत .राजुर गाँव तालुक्यात सर्वात मोठा गाँव म्हणून म्हटल्या जाते .इथे लहान साहन कचरा कुंडीची सुद्धा व्यवस्था आहे परन्तु गावची लोकसंख्या बघता येथे मोठ्या कचरा कुंडीची गरज आहे. 36 क्वार्टर भागात , 75 क्वाटर भागात व भगत सिंग चौकात हे कचर्‍याचे ढिगारे खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत .जबाबदार किंवा संबधित अधिकाऱ्यांनी राजुर कॉलरिचा रस्त्याची पाहणी करून मोठ्या कचर्‍याची कुंडी ,स्वच्छतेची व पर्यावरण स्वच्छ ची जबाबदारी घ्यावी. अन्यथा प्रशासन झोपी गेले असेल तर त्यांना उठवण्याचे कार्य गावातील नागरिक देखील करू शकेल अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!