छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वृक्षरोपण
http://vidarbh24news.com/
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वृक्षरोपण
वरोरा:–छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था तर्फे वृक्षरोपण करण्यात आले
गावातील हनुमान मंदिर जवळ अभिजित कुडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले
लावलेल्या झाडाला ताराच्या जाडीचे कुंपण ही करण्यात आले .
या प्रसंगी अभिजित कुडे म्हणाले की, निसर्गामध्ये समतोल साधण्यासाठी झाडांची भूमिका फार मोठी आहे. प्रत्येक झाड हे संजीवनी ऑक्सिजन पुरवते. झाडे नसल्यामुळे जमिनीची धूप होत आहे . पहीले सारखे मोठे मोठे जंगल आता दिसत नाही त्या मुळे पावसावर ही त्याचा परिणाम होत आहे. दुष्काळाची परिस्थिती ओढवत आहे. समाजमित्र संस्थापक अध्यक्ष न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था अमोल भाऊ घोटेकर यांच्या परिश्रमामुळे १० झाडांचे संवर्धन शक्य झाले आहे यावेळी रोशन भोयर ,रणजित कुडे , तेजस उर कुडे , विजय कुडे यांची उपस्थिती होती.



