1 जुलै पासून टायपिंग प्रशिक्षणाला सुरवात
1 जुलै पासून टायपिंग प्रशिक्षणाला सुरवात
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे संगणक, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखन संस्था बंद होत्या. आता नुकतीच परीक्षा परिषदेने वाणिज्य़, शिक्षण संस्थाना निकष पाळून प्रवेश तासिकांचे वेळा प्रत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हातिल बऱ्याच टायपिंग संस्थामध्ये १ जुलै पासून टायपिंगची प्रवेश प्रक्रीया व प्रशिक्षण सुरु होत आहे. १ जुर्ले पासून सुरू होण्याऱ्या प्रशिक्षणादरम्यान कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे, त्या त्या क्षेत्रामध्ये लागु असलेल्या निर्बंधानुसार संस्था सुरू करावी, विद्यार्थ्याच्या प्रवेशांच्या वेळी सॅनिटायझरचा वापर करावा, प्रत्येक विद्यार्थ्यांचे व संबधीतांचे थर्मल स्कॅनिंग करावे, दोन बॅचेस मध्ये प्रत्येकी अर्धा तासाचे अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल स्वच्छ़ व संगणक, टंखलेखक सॅनिटाईझ करावे, मॉस्क़ बांधणे बंधनकारक करावे व साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी अशा सुचना दिल्या आहेत.



