50 लाखांची अवैध दारू व इतर मुद्देमाल जप्त
चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी अॅक्शन मोड वर आले असुन जिल्ह्यात असलेल्या अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळन्यास पोलीस विभागातर्फे सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 19 जून रोजी पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी ह्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना आदेश देऊन अवैध दारू तस्करी वर निर्बंध सांगितले. त्यानुसार आज जिल्हाभर ठोस कारवाई करण्यात आली असुन विविध पथके तयार करून नाकाबंदी तसेच छापेमारी करण्यात आली.
चंद्रपूर शहर, रामनगर, बल्लारपूर, घुगुस, दुर्गापूर, वरोरा, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मुल, पाथरी, सावली,
पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, विरूर, कोठारी, गडचांदूर, कोरपना, चिमुर शेगाव अंतर्गत पोलीस पथकाने प्रभावी कामगिरी करत दारू तस्करी तसेच विक्री करणार्या विरुद्ध जिल्ह्यात एकुण 73 गुन्ह्यांची नोंद केली असुन 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ह्या कारवाईत एकत्रित असे एकुण 50,78,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.



