*अपूर्व राईंचवार सेट परीक्षा उत्तीर्ण*
सावली : सावली येथील अपूर्व राईंचवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट परीक्षेत उत्तम कामगिरी करत प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 15 जून 2025 रोजी राज्यभरात सेट परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत हजारो विद्यार्थी बसले होते. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत केवळ 6 टक्के विद्यार्थीच पात्र ठरले. त्यामध्ये अपूर्व राईंचवार यांनी रसायनशास्त्र विषयातून उल्लेखनीय यश संपादन करत प्राध्यापक पदाकरिता पात्रता मिळवली. दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये घोषित करण्यात आले.
अपूर्व यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण स्कूल ऑफ कॉलर, गडचिरोली येथे पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथे प्रवेश घेतला. येथेच त्यांनी पदवी आणि रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
अपूर्व राईंचवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाला आणि मार्गदर्शनाला दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य अमूदाला चंद्रमौली, देवराव मुद्दमवार, दिनेश चिटनूरवार, रुपचंद लाटेलवार, विलास यासलवार, नितीन दुव्वावार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
अपूर्व राईंचवार यांचा हा यशस्वी प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन राज्यस्तरीय परीक्षेत पात्रता मिळवणे हे सोपे नव्हते. पण मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. आता पुढे ते प्राध्यापक पदावर कार्यरत होऊन शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दीप देणार, अशी सर्वांची अपेक्षा आहे.



