Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोलीतून शासनाकडे मागणी – पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद व्हावी

गडचिरोली:  येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अनुसूचित जातीतील समाजबांधवांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आज, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त साहेब. समाज कल्याण विभाग गडचिरोली
मार्फत समाजकल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन
यांना निवेदन सादर केले.
यामध्ये पारंपरिक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणे
आजच्या युगात शक्य नसल्याचे नमूद करत, समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी बेरोजगार राहत असून ते नैराश्य व व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.संघटनेच्या निवेदनात, पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी ऑटो-रिक्षा, पिकअप, मेटॅडोर, कार यांसारख्या आधुनिक व्यवसाय साधनांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, उद्यमशीलता वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व कौशल्य विकास कार्यशाळा घेण्याचीही सूचना मांडण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!