Vidarbh24News

Latest Online Breaking News

*चं.जि.म.स. बँकेतर्फे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ कोटी ७० लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप*

“संचालक रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिलासा”

*सावली (बाबा मेश्राम)*
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून खरीप हंगामस २०२६-२७ करिता सावली तालुक्यातील शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणावर पीक कर्जाचे वितरण करण्यात आले ,असून पहिल्या टप्प्यात तालुक्यातील १८ विविध सेवा सहकारी संस्था व सावली, व्याहाड खुर्द, अंतरगाव, पाथरी, लोंढोली या बँक शाखांमार्फत २७८४ शेतकरी सभासदांना तब्बल २२ कोटी ७० लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. या कर्ज वितरणामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात ही कर्ज वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सेवा सहकारी सोसायट्या तसेच बँकेच्या शाखांद्वारे पात्र सभासदांना नियोजनबद्ध पद्धतीने कर्ज वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, शेतीची मशागत, बियाणे, खते, औषधे तसेच अन्य शेती साहित्य खरेदीसाठी अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने बँकेमार्फत विशेष नियोजन करण्यात आले. पीक कर्जामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्ती मिळण्यास मदत होत असून सहकार क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
स़ंचालक रोहित बोम्मावार म्हणाले
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पीक कर्ज पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून आगामी काळातही विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेती, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय यासाठीही बँक विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेच्या कर्ज वितरण कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शाखा व्यवस्थापक, गट सचिव व कर्मचारी यांनी या मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!