शेतकरी सहकारी राईस मिल सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास यासलवार यांची अविरोध निवड*
सावली: तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या शेतकरी सहकारी राईस मिल सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विलास यासलवार यांची अविरोध निवड झाली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून रेंगाळत असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या नियमानुसार वेळेत पार पडत आहेत. त्यातच 26 गावांचा समावेश असलेल्या आणि 891 शेतकरी सदस्य असलेल्या या राईस मिल सोसायटीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
या संस्थेच्या 11 संचालक मंडळाची निवड नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी शंकर डिकोंडवार आणि विलास यासलवार अशी दोन नावे चर्चेत होती. मात्र, एकमताने यासलवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची अविरोध निवड करण्यात आली.
विलास यासलवार हे अनुभवी व सहकार क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते असून, त्यांच्या निवडीने संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल रूपचंद लाटेलवार, बाबा मेश्राम, लोकमत दुधे, नारायण सेमस्कार आदी मान्यवरांनी यासलवार यांचे अभिनंदन केले असून, संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



