Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी*

सावली: चांदली बुज गावात कुरमार समाजातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती दिनांक 31 मे ला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

सायंकाळी इयत्ता दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कुमारी सलोनी राजू मर्लावार हिच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी पाच वाजता एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे संदेश दिले.

नगरातील महिला, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषेत सजून या मिरवणुकीत सहभागी झाले होते. डोल-ताशा आणि मंझीरांच्या गजरात, “येळकोट येळकोट जय मल्हार” आणि “अहिल्यादेवी की जय” अशा गगनभेदी घोषणा देत मिरवणूक गावातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत होती. मिरवणुकीचा समारोप अहिल्यादेवी होळकर चौकात झाला.

वाल्मिकी चौक, हनुमान मंदिर चौक, बिरसा मुंडा चौक, सावित्रीबाई फुले चौक अशा महत्वाच्या ठिकाणी मिरवणुकीचे थांबे होते, आणि नागरिकांनी मिरवणुकीला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

गावातील चिमुकल्यांनी जय मल्हार आणि अहिल्यादेवींची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच रंग आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गावचे सरपंच विठ्ठलजी येग्गावार, पोलीस पाटील चिंतामन बालमवार, समाजप्रमुख गंगाजी मर्लावार व गणेश करेवार यांच्यासह बालाजी आरेवार, मल्लेश अमृतवार, पंकेश कन्नावार, राजेश्वर रामेवार, प्रशांत मुद्रीवार, गणेश मर्लावार, अनिल अमृतवार, मंगेश कन्नावार, अतुल मिडपलवार आणि सर्व युवा वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!