राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारी संस्कारपीठ प्राचार्य डॉ. अनिता वाळके
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारी संस्कारपीठ
प्राचार्य डॉ. अनिता वाळके
सावली – राष्ट्रपिता महात्मा गांधी कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ.चंद्रमौली प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. अनिता वाळके मार्गदर्शक डॉ. प्राशिंक लाकडे वैधकिय अधिकारी सावली प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ रामचंद्र वासेकर रासेयो विभागीय समन्वयक, प्रा.देवीलाल वातखेरे, डॉ. राजश्री मार्कंडेवार उपस्थित होते. यावेळी डॉ अनिता वाळके यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारे संस्कारपीठ असुन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. मुल्य व संस्काराची रुजवणूक होऊन जीवनाला शिस्त लागते असे मौलीक मार्गदर्शन केले. डॉ प्राशिंक लाकडे यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ऐ. चंद्रमौली यांनी राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण समस्या विद्यार्थ्यांना समजून सांगणारे माध्यम असून महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात रासेयो ची स्थापना झाली असून डॉ चंद्रमौली यांनी रासेयो चा इतिहास विशद केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. देवीलाल वातखेरे यांनी केले. संचालन किट्टी शेडमाके तर आभार पुजा कलसार हिने मानले.यावेळी प्रा.प्रशांत वासाडे , प्रा. विनोद बडवाईक, डॉ. विजयसिंह पवार , प्रा घागरगुंडे उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक होते.