Vidarbh24News

Latest Online Breaking News

नाव उलटून सहा महिला ठार

चामोर्शी तालुक्यांतील गणपूर रै येथिल घटना

गणपूर रै व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये-जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सात महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या.

यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी तिचे प्रेत आढळले. ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित सहा महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे. एक महिला या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

मंगळावारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतांमध्ये मिरची तोडण्यासाठी मजुरीवर जाण्यासाठी या महिला छोट्या नावेने वैनगंगा पार करण्यासाठी निघालेल्या होत्या. गणपूर गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटना घडली. एकूण सात जणी या नदीतून पलिकडे निघाल्या होत्या त्यांच्यासोबत नावाडी सुद्धा होता. खराब हवामान आणि चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे नाव हेलकावे खात होती. नाव उलटल्यानंतर नावाडी पोहून नदीबाहेर आला. एका महिलेस वाचविण्यात यश आले. मात्र. सहा महिला पाण्यात बुडून मरण पावल्या. जिजाबाई दादाजी राऊत, पुष्पा झाडे, रेवंता झाडे, मायाबाई राऊत, सुषमा राऊत, बुधाबाई देवाजी राऊत अशी मृत्यामुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर बचावलेल्य महिलेचे नाव सारुबाई सुरेश कस्तुरे असल्याचे सांगण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!