सावलीच्या गृहिणीने दिले तिघांना नवजीवन
एम्समध्ये महिन्यातले तिसरे रिट्रायव्हल
मृत्यूला कवटाळताना उमेदीची पेरणी
सावली: घरात काम करत असताना भोवळ येऊन पडल्याने झालेल्या अपघातात मेंदूपेशी मृत झालेल्या एका गृहिणीने मृत्यूला कवटाळत असताना तिघांच्या जीवनात शुक्रवारी उमेदिची पेरणी केली. सावली येथील या गृहिणीच्या अवयवदानातून उपलब्ध झालेल्या दोन मूत्रपिंडांचे आणि यकृताचे गरजूला प्रत्यारोपण करण्यात आले.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मध्ये झालेले हे या महिन्यातले तिसरे अवयव रिट्रायव्हल तर नागपूरातले वर्षभरातले 35 वे अवयव रिट्रायव्हल ठरले आहे. वंदना दिपक सुत्रपवार(46) असे या सावली येथील गृहिणीचे नाव आहे. वंदना यांना घरात काम करीत असताना अचानक भोवळ आली आणि त्या खाली कोसळल्या, दुखापत त्यांना डोक्याला जबर झाल्याने नातेवाईकांनी आधी त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेले, परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथे एम्समध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर तीन दिवस उपचार सुरु होते, मात्र त्या उपचाराला कसलाही प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. सर्व तपासण्या ताचडतोच करण्यात आल्या. सर्व उपचार आणि प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या मेंदूतला तीव्ररक्तस्राव कमी होत नसल्याचे निदान झाले. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजिकलदृष्ट्या खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदूमृत घोषित केले. समन्वयक प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी नातेवाईकांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. वंदना यांचे पती दीपक सुत्रपवार यांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर विभागीय प्रत्यारोप समितीला ही माहिती देण्यात आले समितीनीने लगेच पुढील प्रक्रिया सुरू केली. कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दोन किडनी, यकृत आणि कोर्निया दान करण्यास लेखी संमती दिली, विभागीय प्रत्यारोपण समितीने प्रतीक्षा यादी तपासू अवयवांचे गरजूंना प्रत्यारोपीत केल वंदना यांच्या दोन्ही किडनीपैकी एक एम्समध्येच प्रतीक्षा यादीत अग्रस्थान असलेल्या 34 वर्षीय पुरुषावर, तर दुसरी एलेक्सिस रुग्णालयातील 59 वर्षी रुग्णावर तर यकृताचे न्यू रुग्णालयातील 47 वर्षीय पुरुषाय प्रत्योरोपण करण्यात आले.



