Vidarbh24News

Latest Online Breaking News

तेलंगणातील निर्मलमध्ये खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील तीनपैकी दोन जागी भाजपला विजय

तिसऱ्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव
विजयी उमेदवार आणि मतदारांचे अभिनंदन
गडचिरोली : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र पक्षाच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात लढवल्या गेलेल्या तीन पैकी दोन मतदार संघात भाजपला यश मिळाले आहे. भाजपने तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असलेल्या तीन मतदार संघांचे प्रभारी म्हणून खा.नेते यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.

निर्मल जिल्हातील निर्मल, मुधोल आणि खानापूर या तीन विधानसभा क्षेत्राची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळण्यासाठी खा.नेते काही दिवसांपासून तेलंगणात तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी प्रचाराची रणनिती ठरवत त्यांना कामी लावले होते. त्याचा परिणाम म्हणून निर्मल विधानसभा क्षेत्रातून भाजपचे माहेश्वर रेड्डी, तसेच मुधोल विधानसभा मतदार संघातून रामाराव पटेल हे दोन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. खानापूर विधानसभेत भाजपच्या उमेदवाराला निसटता पराभव स्वीकारावा लागला.

तीनपैकी दोन जागी पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळाल्याचे समाधान आहे. विजयी उमेदवार आणि मतदारांचे अभिनंदन, पण पराभूत उमेदवारांनी खचून न जाता पक्षाचे काम सतत करत राहावे. पक्ष बळकटीकरणासाठी माझे नेहमीच सर्वांना सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया खा.नेते यांनी व्यक्त केली.

विजय सक्षम नेतृत्वाचा, भाजपाच्या कार्यकर्तृत्वाचा !

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल खा.नेते यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर सर्वसामान्यांचा असलेला विश्वास, तसेच गृह व सहकारमंत्री अमित शाह यांचे परिश्रम व मार्गदर्शनामुळे मध्यप्रदेशमधील सत्ता शाबूत ठेवण्यासोबत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपले वर्चस्व स्थापित करण्यात भाजपला यश आले, अशी प्रतिक्रिया खा.अशोक नेते यांनी व्यक्त केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!