Vidarbh24News

Latest Online Breaking News

*आरोप,प्रत्यारोप, भष्टाचार,झाल्याच्या वादात गाजली केरोडा ग्रा.प .ची ग्रामसभा*…

* ग्रामसभेत ग्रामस्थाचे उग्ररूप *
*शिपाई भर्ती, डस्ट बिन, सायकल , मातीकाम आदी कामात भष्टाचाराचा आरोप *

*पोलिसांचा चोख बंदोबस्त *

*सावली*-(बाबा मेश्राम)—स्थानिक स्वराज्य संस्थेचा शेवटचा आणि अतिशय महत्वाचा स्तर म्हणून ग्रामपंचायत ला ओळखल्या जाते,ग्राम विकासाचा केंद्र बिंदू ग्रामपंचायती असतात.,गावातील रस्ते, नाली ,दिवाबत्ती, आरोग्य ,प्राथमिक शिक्षण ,पाणी पुरवठा, घरकुल आदी कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जातात, ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी व पारदर्शकतेसाठी वर्षातून सर्वसाधारणपणे ४ ग्राभसभा आयोजित केल्या जातात, तर शासनाच्या निर्देशानुसार जनकल्याणकारी योजना.राबविण्यासाठी ३ विशेष ग्रामसभा बोलविण्यात येतात, अशाच ग्रासभेचे आयोजन ग्रामपंचायत केरोडा येथे करण्यात आले,या ग्रामसभेत विषय सुचीनुसार विषय घेण्यात येत असताना ग्रामपंचायत कमेटी व ग्रामस्थांना मध्ये आरोप प्रत्यारोप, सोबतच डस्टबिन खरेदी, सायकल खरेदी व ईतर कामात ग्रामपंचायतने भष्टाचार.केल्याचा आरोप करीत गावातील लोकांनी उग्ररुप धारण केल्याने या सदर ग्रामसभा ही वादावादीत झाल्याचे दिसून आले..
शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अनेक योजना .ग्रामपंचायत राबवित असते ,या योजनाची माहिती ग्रामसभेतुन गावकऱ्यांना दिली जाते,पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केरोडा ची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली,यात गावातील केरकचरा कुंडीत टाकण्यासाठी कचरा कुंडी (डस्टबिन) खरेदी करण्यात आल्या परंतु या खरेदीत मोठा घोळ असल्याचे दिसून आले,तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरीकांच्या हाताला काम देण्यासाठी तलाव.खोलीकरण ,माती काम,नर्सरी ची.कामे करण्यात येतात ,परंतु केरोडा ग्रामपंचायत ने लोकांना कामे न दिला मशीन लावून, जेसीबी लावून कामे केलीत.त त्याचे बिल काढण्यात आल्याचा आरोप यात करण्यात आला , त्याच बरोबर शिपाई भरती मध्ये एकाच घरातील व्यक्तीला का नियुक्त करण्यात आले, नियुक्ती करताना गावात त्याचा जाहीरनामा का लावण्यात आला नाही, असा आरोप ग्रामसभेत करण्यात आला,,ग्रामपंचायत कमेटीने वरील कामात मोठा भष्टाचार केला असल्याचे ग्रामस्थां कडुन सांगितले जात आहे..
पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केरोडा ही ९ सदस्यीय ग्रामपंचायत असुन इथे कांग्रेसची एकहाती सत्ता आहे, या गावाची लोकसंख्या जवळपास २४०० आहे तर मतदार १९०० च्या आसपास आहेत,
सदर ग्रामसभेत ग्रामपंचायत कमेटी वर भष्ट्राचाराचा आरोप करण्यात आला ,तसेच याची योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाववासियांनी केली,यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.गाववासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
———————————————

आज रोजी झालेल्या ग्रा.प .केरोडा च्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे गावकऱ्यांनी समोर आणले, मी सुद्धा ग्रा.प.चा माजी सदस्य होतो,ग्रा.प .प्रशासनात काय चालते याची कल्पना मला आहे,त्यामुळे विद्यमान कमेटीत ग्रा.प अंतर्गत मोठा घोळ केल्याचे.दिसून येत आहे,
विजय उंदीरवाडे, माजी ग्रा.प.सदस्य तथा ग्रामस्थ, ग्रा.प.केरोडा,ता.सावली जि चंद्रपूर
————————————–
ग्रा.प.प्रशासन अंतर्गत झालेल्या विकास कामात कोणत्याही प्रकारचा घोळ झालेला नसून विरोधकांनी केलेला आरोप निरर्थक आहे,चुका तर माणसाच्या हातुन घडतात, विरोधकांना वाटत असेल.तर.तो.निर्णय बदलविण्यात येईल.
ओमप्रकाश ढोलणे,प्रभारी सरपंच ,ग्रा.प.केरोडा ता.सावली जि चंद्रपूर

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!