आंतरराष्ट्रीय साक्षरतादिन किसान विद्यालयात साजरा
किसान विद्यालय जेप्रा येथे आज दिनांक ८ सप्टेबर २०२३ ला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त वर्ग ५ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी , ग्रंथ दिंडी चे आयोजन केले, जेप्रा राजगाटामाल गावातून, तांड्यातून,फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे नारे, घोषवाक्य, भजन गायले. दिंडी मद्ये वर्ग ५ ते १०च्या विद्यार्थ्यांमद्ये बॅंड पथकानचे नेतृत्व यश मेश्राम, नैतीक मडावी आणि चमू यांनी केले

वर्ग १२ चे प्रफुल्ल शेंडे आणि चमू यांनी ढोलकी, मंजरी टाळ, झांज वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी विद्यालयाचे वरीष्ठ शिक्षक विलास मेश्राम, अरविंद ऊरकुडे, ओमदेव रडके, गुरुदेव चापले, विनोद गोबाडे, ऊज्वला तायडे, मिना म्हशाखेत्री, प्राध्यापक सचीन म्हशाखेत्री, यांनी दिंडी साक्षरता जनजागृती चे महत्व विषद केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले.शालेयप्रांगणात दिंडीचे समापन करण्यात आले.



