Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मॅजिक बस संस्थेच्या वतीने, पोषण आहार सप्ताह संपन्न*

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
दिनांक :- ०१ ते ०७ सप्टेंबर हा कालावधी पोषण आहार सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या सप्ताहाचे औचित्य साधून १ ते ७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मॅजिक बस संस्थेच्या वत्तीने गडचिरोली जिल्ह्यात, चामोर्शी तालुक्यातील मौजा भेंडाळा या गावामध्ये पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या निमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी पाककला स्पर्धा, माझा पोषक आहार तक्ता स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. त्या सोबतच गावात प्रभातफेरी काढण्यात आली आणि पोषण आहारा संदर्भात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात आले. इत्यादी कार्यक्रम घेऊन पोषन आहार सप्ताह साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय नगराडे मॅडम ANM प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा, या लाभल्या तसेच अंगणवाडी सेविका,आशावर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार, रोशन तिवाडे, दिपक ढपकस व समुदाय समन्वयक कु. समिक्षा खंडाळे, तेजस्विनी तुंबडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!