*बोथली येथे मेंढपाळवर वाघाचा हल्ला मेंढपाळ गंभीर जखमी
*बोथली येथे मेंढपाळवर वाघाचा हल्ला मेंढपाळ गंभीर जखमी*
काल दिनांक ०७/०७/२०२३ ला रात्री सावली तालुक्यातील पांढरसळा येथे बेंबाळ ता.मुल जि चंद्रपूर येथील भीमा घटको कन्नावार यांचे वर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यांच्या कळपातील एक दोन मेंढ्या यांना सुद्धा जखमी केले व एक मेंढी उचलून नेले त्यात भीमा घटकु कन्नावार हे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केली आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या घरी पत्नी आहे ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचे परिवारावर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे गावातील माजी सरपंच मुन्ना भाऊ कोटगले यांनी तात्काळ मान.सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंदूभाऊ मारगोनवार माजी सभापती पस मुल यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुन्ना भाऊ कोटगले यांचा फोन जाताच चंदूभाऊ मारगोणवार यांनी स्वतः रुग्णाच्या नातेवाईकशी संपर्क करून परीस्थिती चा आढावा घेवून पुढील मदतीसाठी प्रयत्न चालवले आहेत.



