Vidarbh24News

Latest Online Breaking News

*शेतकऱ्यांसाठी खरिपासाठी एक रूपयात सर्वसमावेशक पिक विमा.*

**प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशी

*करा एक रुपयात पिक संरक्षित*

सावली (रुपचंद लाटेलवार)

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच फक्त एक रुपयात महाराष्ट्र शासनाने लागू केला आहे. नाहीतर दरवर्षी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८००- १५०० रूपये पर्यंत विमा रक्कम भरावी लागत होती. विमाधारक आणि राज्य सरकार यांचा ५०-५० टक्के वाटा राहत होता. सन २०२३ २४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न आधारित राबविली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनी वर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यापर्यंत असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल, तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्क्यापेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वत कडे नफा म्हणून ठेवून उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनाकडे परत करणार आहे.

योजनेतील पीके भात (धान) खरीप ज्वारी, बाजरी, नाचनी (रागी) मका, तूर, मूग, तीळ, उडिद, सूर्य फूल, सोयाबीन, कापूस, भुईमूग, कारले, कांदा इत्यादी पीकाच्या विमाची मुदत दि. ३१ जुलै योजनेत २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्याहून अधीक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे. काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस कापणी काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पीकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली.
*भात पिकाच्या बाबतीत अल निनो चा प्रभाव झाल्यास किंवा पावसात खंड पडल्यास विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम पिक विमा म्हणून शेतकऱ्यांना भेटेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.*

विमा योजनेअंतर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. बँक खाते योग्य नोंदविण्याची खबरदारी शेतकन्यांनी घ्यावी.
योजना राबविणारी विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. विमा सहभागी होण्याकरिता अधिसूचित
क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकन्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांने आपला ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली
पोहोच पावती त्याने जपून ठेवावी. कामन सर्विस सेंटर, आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता. या योजनेत आपण जे पीक लावले आहे त्याचाच विमा घ्यावा, शेतात विमा घेतलेला पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे.

*नुकसान भरपाई मिळण्यासाठी*
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान सरासरी झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा APP, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसान प्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम वधीत निश्चित केली जाते.

*स्टेटमेंट*
प्रधानमंत्री विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी करावी, शेवटीं शेवटी सर्व्हरवर ताण येऊ शकतो, शक्यतो लवकरात लवकर पिक विमा एक रुपयात काढून आपले पिक संरक्षित करावे.
*सावली तालुका कृषि अधिकारी अश्विनी गोडसे*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!