Vidarbh24News

Latest Online Breaking News

रस्ता दुरुस्तीसाठी तेवीस निवेदने व तेरा आंदोलने करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग नाही

नागरी-माढेली चौदा की.मी अंतराच्या रस्त्याची दुर्दशा

युवा सामाजिक कार्यकर्ता अभिजित कुडे रस्ता दुरुस्तीसाठी सतत दोन वर्षापासून संघर्ष

वरोरा तालुक्यातील माढेली ते नागरी हा 14 की.मी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.दोन्ही गावे बाजारपेठेची असून माढेली गावापासून काही अंतरावर यवतमाळ व वर्धा जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तर नागरी गावाला लगत वर्धा जिल्ह्याची सीमा आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना माढेली-नागरी रस्ता अति महत्वाचा आहे.
परंतु सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी वाहने तर सोडा साधा पादचारी पायदळ सुद्धा रस्त्यावरून चालू शकत नाही इतकी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. युवा सामाजिक कार्यकर्ता अभिजित कुडे याने रस्ते दुरुस्तीची कास धरली .आणि गेल्या दोन वर्षात 23 निवेदने व 13 आंदोलने केली.परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्ग नाही
सदर हा एकच रस्ता नाही तर तालुक्यातच रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. पावसाळा सुरू झाला असून पावसाचे पाणी रस्त्यात पडणाऱ्या खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना पाण्यातील खड्डे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीसाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अभिजित कुडे यांनी मागणी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!