गोठ्यातील शेळ्यावर बिबट्याचा हल्ला
सावली पासुन ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या केशरवाही येथील यशवंत शेंडे यांच्या गोठ्यात खूंटी ला बांधुन असलेल्या शेळ्यावर रात्री ११ वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला तेंव्हा घरातील लोक जागेच होतें ते उठून खिडकीतून पाहिले असता बिबट्या शेळीवर ताव मारीत होता. सर्वांनी एकावेळी ओरडले असता बिबट्या पळून गेला.

यामध्ये यशवंत शेंडे यांचे बरेचं नुकसान झाले असुन या गावातील ही पहिलीच घटना नाही तर ही चवथी घटना आहे. या परिसरात बिबट्या, वाघांचा नेहमीच वावर असतो. इतक नुकसान एक साधारण शेतकऱ्याच झाल असून वनविभाग मात्र झोपेचं सोंग घेऊन आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



