Vidarbh24News

Latest Online Breaking News

 शेतकऱ्यांनी शेतपूरक दुग्ध व्यवसाय व नवीन पिकांच्या उत्पादनाला चालना द्यावी.— आमदार विजय वडेट्टीवार*

सावली:प्रा.शेखर प्यारमवार

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी *माजी कॅबिनेट मंत्री (म.रा) तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र,लोकनेते शेतकरी-पुत्र मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार* यांच्या अध्यक्षखाली *विशेष तक्रार निवारण सभा* तालुक्यातील मौजा व्याहाड खुर्द, येथे सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फेआयोजित केली होती.

या तक्रार निवारण सभेचे मुख्य
*१.पाणी उपलब्धतेबाबतच्या सर्व समस्या निकाली लावणे २.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणेबाबत तसेंच ३.शेतकऱ्यांकडून सभेप्रसंगी विषयान्वये वेळेवर येणाऱ्या सुचना व तक्रारी.* हे प्रमुख विषय ठेवण्यात आले होते.

*या तक्रार निवारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती जि.प.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीनजी गोहने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेरकी, दिवाकरजी भांडेकर,विजय कोरेवार, सरपंच सुनीताताई उरकुडे,उपसरपंच भावनाताई बीके, दीपक जवादे , संचालक कृषी बाजार समित.निखिल सुरमवार, सदस्य केशव भरडकर,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, आशिष मंबतुलवार, अनिल म्हशाखेत्री व सुनिल बोमणवार तसेच आयोजित सभेस गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा समस्या तातडीने निकाली काढण्याकरिता गोसेखुर्द प्रकल्पाचे प्रमुख कार्यकारी अभियंता मा.राजेश सोनवणे,मा.जितेंद्र तुरखळे,मा.संदीप हासे तसेच पोलीस विभागातर्फे सावलीचे ठाणेदार मा.आशिष बोरकर व संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांचा समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना विजय वडेट्टीवार यांनी सूचना दिल्या.*

*अध्यक्ष स्थानावरून बोलताना राज्याचे माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की, सावली तालुक्यातील जनतेला घोसेखुर्द प्रकल्प आल्याने हजारो हेक्टर जमिनीला त्याचा फायदा झाला.मी राज्यमंत्री असताना मा.सोनियाजी गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग जि यांच्याकडे घोसेखुर्द प्रकल्पचा मुद्दा मांडला,गोसेखुर्द हा राज्यस्तरीय प्रकल्प बहुऊदेशिय महत्वाचे असल्याने त्याला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून अवघ्या दीड- दोन महिन्यात या प्रकल्पाला ५००० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.*
*शेतकऱ्यांवर आत्महतेची वेळ येऊ नये,त्यांचा जमिनी सुजलाम सुफलाम व्हाव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांना शेती पाणी भेटणे आवश्यक आहे, अंडर ग्राऊंड प्रणालीद्वारे तालुक्यातील ७५% शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम चालू असून उर्वरित २५% काम पूर्णत्वास येत आहे.चंद्रपूर जिल्ह्याला आणखी ५०० कोटी रुपयांची आवश्यकता असून आपल्या भागात २५% लोकांना दुबार पेरणीसाठी पाणी पुरवले जाणार त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांनी समंजस्याची भूमिका घेऊन एकमेकाला सहाय्य केले पाहिजे.शेतकऱ्यांनी २ वर्षात धान नाही पिकवले तरी देशात उपलब्ध भरपूर साठा आहे.नव-नवीन पिके घेण्याचे धाडस शेतकऱ्यांनी करावे, शेतपूरक दुग्ध व्यवसायला चालना देली पाहिजे, आपल्या भागात लवकरच नवीन प्रकल्प होणार आहेत त्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.*
*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल गुरुनुले तर आभार कमलेश गेडाम यांनी मानले.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!