*जे.के.पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल*
“सतत चार वर्षांपासून १०० टक्के निकाल देणारी शाळा
*सावली*(बाबा मेश्राम/ लोकमत दुधे)— राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रु,मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या ईयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल घोषित झाला, यात सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जे.के. पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे, विद्यालयातुन २९ विद्यार्थी परिक्षेत बसलेले होते ,आणि सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत,
अशोका बहुउद्देशिय शिक्षण संस्था व्याहाड खुर्द द्वारा संचालीत जे.के.पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा मागील चार वर्षांपासून १०० टक्के निकाल लागत आहे, या विद्यालयातील ओम यशवंत आयतुलवार या विद्यार्थ्यांने ६९.५० टक्के गुण मिळवून विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान मिळविला, त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक केले जात आहे.
अशोक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक जे.के.पाल,संस्था अध्यक्ष अविनाश पाल,प्राचार्य प्रदीप चुधरी,ज्योती चुधरी,रोशन गावतुरे,प्राजक्ता गेडाम, हिराचंद चूनारकर तुळशिदास भुरसे, रंजीत कामटकर,सोनी मेश्राम, लता झलके,मोनिका आभारे सह सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत…



