पाथरी येथील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय चा उत्कृष्ट निकाल…
पाथरी:- म. रा. माध्य. व उच्च माध्य. विभागीय शिक्षण मंडळ नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या इ. 12 वी परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवीत यावर्षी सुद्धा संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय पाथरी चा निकाल 92.85% लागला असून प्रथम श्रेणी एकूण 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले या परीक्षेत 56 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले महाविद्यालयातून कुमारी स्वाती कैलास मडावी 73.00टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर मुक्तेश्वर सुरेश नागवसे द्वितीय यांनी 71.17 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आणि समीर सुरेंद्र रोहनकर यांनी 68.17% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाले या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एड. गोविंद भेंडारकर सचिव हरिभाऊ पथोडे प्राचार्य दिलीप डोरलीकर प्रा. ढोंगे, प्रा. डॉ. योगिता भसारकर,प्रा. अतीन मानकर, शिक्षकेतर कर्मचारी काशीवार, सुनील सोनवाणे व सर्व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे



