Vidarbh24News

Latest Online Breaking News

मंजेगाव येथे तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव

मंजेगाव येथे तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव
घोट : ५ मे
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया व शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त बुद्ध पौर्णिमेच्या बौध्द विकास बहुउद्देशीय संस्था आंबेडकर नगर मंजेगांव येथे मोहत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चापलवाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच गंगाधर रामटेके हे होते तर प्रमुख मार्गदर्शक संजय गोरडवार, प्रमोद रामटेके , दिलीप मोहुर्ले होते. प्रमुख पाहुणे ज्योती रामटेके. ग्रा. प . सदस्य, जयश्री रामटेके अंगणवाडी सेविका, अर्चना गोरडवार अंगणवाडी मदतनिस, बौध्द विकास बहुउद्देशीय संस्था उपाध्यक्ष प्रकाश मोहुर्ले , सहसचीव दिपक पुजलवार , राकेश आत्राम, कोषाध्यक्ष अशोक देटे , सदस्य मनोज रामटेके , परमेश्वर मोहुर्ले, शालीक मोहुर्ले , विलास देटे , रमेश गोरडवार , बालाजी मोहुलें ,सुरेश मोहुलें , तुळशीराम मोहुर्ले , बाळु आत्राम आदी उपस्थित होते.

 

गडचिरोली येथील दि . बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे महासचीव लेखक धर्मराव तानादु यांचे कडून सुखी जीवन मार्ग ह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक गंगाधर रामटेके तर आभार प्रलय यांनी मानले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!