एक हजारात शेतकऱ्याच्या वारसाला मिळाले २० लाखांचे विमा कवच
गडचांदूर : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत एका शेतकरी कुटुंबाला दोन लाखांचा, तर भारतीय स्टेट बँकेच्या ५०० रुपयांच्या अपघात विम्यावर दहा लाखांचा, तर एक हजार रुपयांच्या अपघात विम्यावर तब्बल २० लाखांचा अपघात विमा भारतीय स्टेट बँक कवठाडाच्या वतीने बँकेचे शाखा व्यवस्थापक विनोद लाटेलवार यांच्या हस्ते वारसांना देण्यात आला.
जनसामान्यांना अल्प दरात विमा काढता यावा, यासाठी शासनाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे. कवठाडा बँकेंतर्गत एका शेतकऱ्याने १२ रुपयांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरवला होता. त्या शेतकऱ्याचे वारस निकिता पुरुषोत्तम निर याला दोन लाख रुपयांचा विमा धनादेश देताना शाखा व्यवस्थापक विनोद लाटेलवार.
परतावा दिला, तर ५०० रुपयांच्या अपघात विम्यावर नीता विठ्ठल गुंजेकर यांना दहा लाखांचा विमा परतावा, तर एक हजार रुपयांच्या अपघात विम्यावर हेमलता बंडू पाटील यांना २० लाख रुपयांचा विमा परतावा भारतीय स्टेट बँकेमार्फत क्षेत्रीय बँकेच्या सहकार्याने देण्यात आला. विनोद लाटेलवार यांच्या हस्ते तिनही लाभार्थ्यांच्या वारसांना विम्याच्य परताव्याचा धनादेश देण्यात आला यावेळी बँकेतील अधिकारी व कर्मचा उपस्थित होते. जास्तीत जास नागरिकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कवठाला बँकेचे शाखा व्यवस्थापक विनोद लाटेलवार यांनी केले आहे.



