मत्स्य व्यवसायाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध-.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
थाटात पार पडला मत्स्य महोत्सव
मत्स्यव्यवसाय करणाऱ्या व्यक्तिना दोन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. फक्त मासेमासी करुन पोटभरण्यासाठी याकडे न पाहता मत्स्य संवर्शन करून व्यावसायिक दृष्टीने या व्ययसायाकडे बघावे. “मागेल त्याला मत्स्य तळे” ही योजना सूरु करण्यात येणार आहे. फॉरेस्ट (वने) अधिक फिशरी (मत्स्य) बरोबर फायनान्स (अर्थ) असे समीकरण मांडणार आहोत असे सावली तालु्यातील एन. के. एक्काकल्चर पेंढरी येथील मार्गदर्शन कार्यशाळेत वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या खूच वाढली आहे. याच्या बंदोबस्तासाठी जिल्हयातील वाघ स्थलांतरित करीत आहोत. प्रायोगिक तत्वावर पाच वाघ नवेगाव बांध येथिल अभयारण्यात स्थलांतरित करण्यात येत आहे. मानवावर हमले कमी व्हावे म्हणून गाव आणि जंगलाच्या मधात कुंपण करण्यात येत आहे. डूकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या आरएफओकडून परवानगी घेऊन गावात येणाऱ्या डुकराला मारता येणार आहे. पुर्वीसारखं डुकरं मारल्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील यांच्या समक्ष पुरण्याची गरज नाही. आता त्याला मातीत पुरायच की पोटात पुरायच तो तुमचा विषय आहे, असे म्हटल्यावर उपस्थितात हशा पिकला.
काही काही मास्यांची किंमत लाखोच्या घरात आहे. घोल नावाच्या मास्याची किमत्त ५ लाख रुपये आहे. हा मासा समुद्रात आढळतो. हे २० मासे मिळाले की महाराष्ट्राची लॉटरी लागल्यासारखी होते. वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे

आदेश आहेत परंतु नुकसान भरपाई देण्यात विलंब झाल्यास १० टक्के व्याजदराने वसूल केल्या जाईल त्यामूळे शेतकरी बांधवांना शेतीची किंव्हा जनावराची नुकसान झाल्यास चिंता करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. मत्स्य व्यवसाय विभागात १९४७- ते २०१८ पर्यंत फक्त ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाच वर्षांच्या कार्यकाळात ३० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले.
या विभागात आजपर्यंत नोकरीच्या संधी नव्हत्या आता १५०० जागा भरण्याचा प्रावधान महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी निर्माण करून रोजगाराला चालना देण्यात येणार आहे.

याप्रसंगी सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री, अशोक नेते खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, विजय वडेट्टीवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपुर, रविंद्र वायडा सहआयुक्त मत्स्यव्यवसाय, विजय शिखरे प्रादेशिक उपआयुक्त,चंद्रलाल मेश्राम सेवानिवृत्त न्यायाधीश, निनाद गड्डमवार आयोजक एन. के. एक्काकल्चर, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन एस. टी. मोर्चा, तसेच अधिकारी वर्ग, पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिखरे, सूत्रसंचालन राखी बंडावार यांनी केले. यावेळी बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.



