आज मत्सव्यवसाय कार्यशाळेचे पेंढरीला आयोजन
पालकमंत्री सुधिर मुनगंटीवारसह अनेक लोकप्रतिनिधी एकाच मंचावर
हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकातर्फे आव्हाहन
मत्सव्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी व विविध मत्सव्यवसाय विषयक शासकीय उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक क्षेत्रातील भागधारकांना देण्याकरिता आज 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मत्स्य महोत्सव व कार्यशाळा एन. के. अॅक्वाकल्चर, मत्स्यबीज केंद्र, पेढंरीमक्ता, ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यशाळा होणार आहे.
या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धक, मत्स्यविक्रेता, मत्स्य बिजोत्पादक, मत्स्यखाद्य निर्मिती कंपनी, मत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित येणार आहेत.
या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धक, मत्स्यविक्रेता, मत्स्य बिजोत्पादक, मत्स्यखाद्य निर्मिती कंपनी, मत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित येणार आहेत. यावेळी नवीनतं त्रज्ञानाचे आदान प्रदान, तांत्रिक मार्गदर्शन, उपलब्ध संधीचा शोध, विविध शासकीय योजना, रोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता आदी उद्दिष्टे समायोजित करण्यात आली आहे.
यावेळी पाहुणे म्हणून चिमुर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खा.बाळु धानोरकर, तर विधान परिषद सदस्य आ. सुधाकर अडबाले, ( शिक्षक मतदार संघ, नागपुर विभाग), स्थानिक प्राधिकरण संस्था, वि प. सदस्य आ. डॉ रामदास आंबटकर, पदवीधर मतदार संघ, वि प. सदस्य आम.अभिजित वंजारी, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आम. विजय वड्डेटिवार चिमुर विधानसभा क्षेत्राचे आम. बंटी भांगडीया, राजुरा वि स क्षेत्र आम.सुभाष धोटे,चंद्रपूर वि.स. आम किशोरजोरगेवार, भद्रावती विस, प्रतिभा धानोरकर आदींची उपस्थित राहणार आहे, सोबतच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मत्स्यव्यवसाय सचिव म. रा. तथा आयुक्त डॉ अतुल पाटणे, जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर, तर विशेष निमंत्रित वणी वि.स आम संजीव रेड्डी, माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील नागरीक, मत्स्यसंवर्धक व शेतकरी यांनी या महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मेळाव्यातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी बळकटे यांनी केले आहे.



