सावली तालुक्यातील संगणक परिचालकांचे बेमुदत धरणे
*गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
प्रतिनिधी:सावली (चंद्रशेखर प्यारमवार )
सावली तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मार्च 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले असून याचा फटका महाराष्ट्रातील 29000 ग्रामपंचायत सोबत सावली तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीला बसणार असून गावातील नागरिक ऑनलाईन कामापासून वंचित राहणार आहेत.
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील ११ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक करीत आहेत. त्यासोबत कोरोना काळात संगणक परी चालकांनी जनतेला सेवा दिली. ग्रामपंचायत आणि इतर कार्य पार पडत असताना महागाईच्या काळात केवळ ७ हजार रुपये मानधन मिळत असताना उदरनिर्वाह भागविणे कठीण होत चालले आहे.
ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या *यावलकर समितीने* 2018 मध्ये सर्व संगणक परी चालकांना ग्रामपंचायत सुधारित आकृती बंद बाबत पदनिर्मिती करण्याची शिफारस केली आहे.परंतु शासनाने कोणताही निर्णय घेतल्याने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ मार्च २०२२ पासून आझाद मैदान मुंबई येथे संगणक परिचकाकडे असलेले सर्व कामे बंद ठेवून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सावलीच्या शिष्टमंडळांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली यांना देण्यात आले आहे शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष निलेश पुटकामवार, उपाध्यक्ष राकेश मुळे,सचिव प्रशांत घोडे उपस्थित होते.



