कच्चेपार येथे एकाच दिवशी दोन दुर्दैवी घटना.
सिंदेवाही जवळ असलेल्या कच्चेपार येथे एकाच दिवसांत दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सदर गाव परीसरामधील पट्टेदार वाघाने गुराखी बाबुराव देवतळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात शिरून पांढऱ्या रंगाच्या बैलावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना काल रात्री १२:३० च्या दरम्यान घडली. सदर गाव जंगलाने वेढला असल्याने कालच गट क्रमांक १४७ मध्ये गुरे चारून घरी परत असताना गुराखी बाबुराव लक्ष्मण वय ५६ वर्षे यांना ०५:३० च्या दरम्यान पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयातूण रेफर केल्यानंतर उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना राजोली जवळ त्यांचा शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सदरील दोन्ही घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनांची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा. व पिडीताना मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.



