Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाने केले गुराख्याला जखमी कच्चेपार मधील घटना

सिंदेवाही वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र सिंदेवाही बिटातील (कच्चेपार) गट क्रमांक १४७ मध्ये गुराखी बाबुराव लक्ष्मण देवतळे वय ५६ वर्ष याच्यावर जंगलातून गुरे चारून घराकडे येत असतांना सायंकाळी ०५.३० वाजे दरम्यान पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कच्चेपार येथील गुराखी बाबुराव देवतळे हा जंगलातून गुरे चारून घराकडे आणत असतांना अचानक पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. संजय रामदास नैताम रा. कच्चेपार हे आपल्या शेतावरून तणशीचा गठ्ठा घेऊन घराकडे येत असतांना त्यांना मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने डोक्यावरील तणशीचा गठ्ठा तेथेच टाकून त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.ते घटना स्थळावर पोहोचले तेव्हा पट्टेदार वाघाने गुराखी बाबुराव यांना पकडले होते. प्रसंगावधान राखून संजय यांनी आरडाओरड करत गावात फोन लावून घडलेली घटना सांगितली. लगेच गावकरी घटनास्थळी दाखल झाले वाघाने गर्दी पाहताच जंगलाकडे पळ काढला. सदर घटनेची माहिती मिळताच वनरक्षक कोहाडे तसेच गावातील धनराज सरपाते, साईनाथ सोनट्टके, प्रभाकर गव्हारे,रवींद्र कोवे, मुखरू जिवतोडे, सुमित चलाख, केजराज सरपाते व अमोल कोवे यांना कळताच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबुराव यांना प्राथमिक उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, उपक्षेत्र अधिकारी हटवार, उपक्षेत्र अधीकारी पेंदोर, वनरक्षक चौधरी उपस्थित होते.बाबुराव देवतळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी वनविभागाच्या वतीने उपक्षेत्र अधिकारी हटवार यांनी ५०००/- रुपयांची तातडीची आर्थिक मदत परीवारातील सदस्यांकडे सुपुर्द केली.परंतू सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा आणि बाबुराव देवतळे यांना योग्य आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!