Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही बस्थानकावरील शौचालयामधील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी दिले निवेदन

सिंदेवाही बस्थानकावरील शौचालयामधील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी दिले निवेदन

सिंदेवाही येथे बसस्थानकामध्ये प्रवाश्यांकरीता शौचालय व मुतारी घर तयार करण्यात आले आहे. परंतु बस स्थानकामधील शौचालयाचे शोषखड्डे फुटलेले तसेच तुडुंब भरल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही सदर परिसरातील  नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. शौचालयाचे सांडपाणी सदरील परिसरात पसरत असल्याने त्या परिसरामध्ये घानीचे साम्राज्य वाढले असून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून नागरिकांच्या आरोग्यास हाणी होत आहे. सदर परिसरात सांडपाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांच्या वारंवार तकारी प्राप्त होत आहेत. सदर बाब ही फार गंभीर आहे. तसेच बस स्थानक स्थापनेपासून  बस स्थानक परिसरातील वाढलेला केर कचरा स्वच्छ करण्यात आलेला नाही. तसेच  शौचालयाच्या सांडपाण्याची व्यवस्था अंडर ग्राउंड पध्दतीने करण्यात यावे. व 15 दिवसाच्या आत सांडपाण्याचे योग्य विल्हेवाट लावून सदर समस्येचे निराकरण करण्यात यावे. अन्यथा सिंदेवाही ब्रम्हपुरी बस वाहतूक व्यवस्था बंद चे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत उपाध्यक्ष मयुर सूचक, भास्कर नन्नावार नगरसेवक, मिलिंद चिमूरकर सामाजिक कार्यकर्ता, नंदू डोर्लीकर सामाजिक कार्यकर्ता यांनी  दिले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!