कुणबी समाज संघटना सावली तर्फे संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न
कुणबी समाज संघटना सावली तर्फे संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजा व्याहाड(खुर्द) येथे दि.२ फेब्रुवारी 2023 ला स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट समोरील भव्य पटांगणावर कुणबी समाज संघटना तालुका सावली च्या वतीने भव्य रॅली व पालखीचे तसेच समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुप्रसिद्ध संत होते. त्यांनी समाजाला अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व समाजात असलेल्या अनिष्ट रूढी,परंपरा, विरुद्ध समाजात जनजागृती करण्याचं व समाजाला नवीन दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांचे अभंग,गाथा हे जीवन जगण्याचा सार आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुणबी समाजाच्या वतीने भव्य रॅली व पालखीचे आयोजन करण्यात आले. पालखीत वेशभूषा केलेली मुले, गुरुदेव सेवा मंडळाचे भजन व दिंडी तसेच समाजाच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. रॅलीच्या कार्यक्रमानंतर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री बळीराज धोटे मुख्य संयोजक ओबीसी जनगणना समिती चंद्रपूर उपस्थित होते.प्रास्ताविक श्री अर्जुनजी भोयर अध्यक्ष कुणबी समाज संघटना सावली तर मार्गदर्शन ,सचिव सौ.उषाताई भोयर, सदस्य श्रीकवींद्र रोहनकर,श्री नितीन गोहणे यांनी केले.यावेळी सौ. सुनिता उरकुडे, मार्गदर्शक अविनाश पाल, माजी अध्यक्ष दौलतजी भोपये, टिकाराम रोहनकर, अरुण पाल, दिपक जवादे, किशोर वाकुडकर, सदाशिव बोबाटे, किशोर घोटेकर, पुनम झाडे, मिथुन बाबनवाडे, खुशाल लोढे, दादाजी पाटील किनेकर, जोगेश्वरजी पाल, भाऊजी कीनेकर, धनराज डबले, मोतीराम चिमूरकर, पुरुषोत्तम चुधरी, विनोद धोटे, मारुती बबनवाडे, सदानंद किनेकर, केशव भरडकर,सौ. सुनिता उरकुडे प्रतिभाताई बोबाटे, मीनाक्षीताई वाकुडकर, मनीषाताई चिमूरकर, योगिताताई डबले, ज्योती पाल,मनीषा जवादे गोहणे ,शोभाताई बबनवाडे, उपस्थित होते.या कार्यक्रमाला सावली तालुक्यातील मोठ्या संख्येत कुणबी समाज बांधव भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन गिरीश चिमूरकर व आभार प्रदर्शन पुनम झाडे यांनी मानले.



