*विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर*
*विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर*
+महावीर इंटर नॉशनल सेंटर सावलीचे आयोजन+
*सावली(बाबा मेश्राम)*_ सेवाग्राम मेडीकल कॉलेज ,सेवाग्राम, आरोग्य विभाग चंद्रपुर,महावीर चंद्रपुर सेंटर,राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय ,सावली, यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटर नॉशनल सेंटर सावली आयोजित विनामूल्य मोतीबिंदु डोळे तपासणी शिबीराचे आयोजन दि.५फेब्रुवारी २०२३ ला,स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे आयोजित करण्यात आले आहे,सदर शिबिर स.११ते दु ३या वेळेत राबविण्यात येणार आहे, तसेच या शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दि.६फेब्रुवारी २०२३ला सेवाग्राम येथे ,सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या नेत्रतज्ञांच्या हस्ते करण्यात येणार आहे ,तरी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा,.

शिबिरात येताना आधार कार्ड/रेशन कार्ड/वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र म्हणून आणावे ,त्या शिवाय शिबिरात तपासणी केली जाणार नाही, व तसेच कोवीड नियमानुसार मास्क लावून व सामाजिक अंतर राखावे.
विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीरात विविध सुविधा देण्यात येणार आहेत, त्यात (१),सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील नेत्र विभागातील तज्ञ चमु विनामूल्य मोतीबिंदू डोळ्याची तपासणी करतील,२)रुग्णांना सावली ते सेवाग्राम येथे नेण्याची व परत वापस आणण्याची सोय लॉयन्स आय हास्पिटल सेवाग्राम बसने मोफत करण्यात येईल,३)शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना निवास, भोजन व औषधे विनामूल्य देण्यात येईल,४)डोळे तपासणी साठी येणाऱ्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी जाण्याच्या तयारीने यावे,५)या रुग्णांना त्याच दिवशी सायंकाळी सेवाग्राम आय हास्पिटल ला नेण्यात येईल,६)रुग्णांनी स्वत:चे गरम कपडे व पांघरुन व बदलण्यासाठी कपडे आणणे आवश्यक आहे,.या शिबिरात ५० वर्षावरील रुग्णांची मोतीबिंदु साठी नेत्र तपासणी करण्यात येईल.
या शिबिराचे आयोजन महावीर इंटरनॉशनल सेंटर चे प्रमुख मार्गदर्शक नेत्रतज्ञ ,सेवाग्राम मेडीकल कॉलेज चे डॉ .शुक्ला,ग्रामीण रुग्णालय,सावली चे नेत्र चिकित्सक डॉ देवानंद येरमे,कव्हरनिंग काऊसिंग मेंबर एन बी भंडारी,महावीर इंटरनेशनल चंद्रपुर चे वीर इंजी.दिलीप भंडारी,चंद्रपुर महावीर इंटरनाशनल अध्यक्ष वीर हरीश मुथा,सचिव मनिष खठोड,महावीर इंटरनाशनल सावली अध्यक्ष प्रकाश खंजाची,सचिव प्रफुल्ल बट्टे,आदींच्या मार्गदर्शना बरोबरच सावली येथील राजाबाळ पा.संगीडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ,मनोज ताटकोंडावार,संतप्रकाश शुक्ला,अशोक पोटवार,प्रा.अरुण राऊत ,जगदीश बन्सोड,किशोर संगीडवार,राजेश रक्षणवार,अजय पोटवार, किरण जक्कुलवार,अजय पोहनकर,रविंद्र ताटकोंडावार,अमोल तिगलवार,राहुल मेरुगवार,विनोद बांगरे,महेश वि.चौधरी आदींच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
रुग्णांनी या शिबिरात येण्यासाठीची नोंदणी ४फेब्रुवारी च्या आत आयोजकाकडे नोंदवावी, सदर शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आयोजका कडुन आवाहन करण्यात येत आहे….



